Information On Parrot In Marathi | पोपटाबद्दल माहिती आणि निबंध (Essay)

पोपटाबद्दल माहिती आणि निबंध | information & essay on parrot in marathi.

या पोस्टमध्ये आहे पोपटाबद्दल माहिती ( Information On Parrot In Marathi ) तसेच निबंध.

information on parrot in marathi

पोपट हा एक अतिशय सुंदर, अविश्वसनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी आहे. जगभरात सुमारे ३७२ प्रजातींचे पोपट आढळतात. पोपट हे चमकदार रंगाचे आढळतात. भारतातील पोपट हे हिरव्या रंगाचे असतात.

त्यांना लाल वक्राकार चोच, दोन पाय ज्यांना प्रत्येकी चार चार नख्या असतात तसेच त्यांना हिरवी पिसे असतात. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचा वक्राकार वलय आढळतो. पोपट हे उष्णकटिबंधीय हवामानातच आढळतात. ते असे एकमेव पक्षी आहेत जे तोंडात अन्न आणण्यासाठी त्याच्या पायाचा वापर करू शकतात.

पोपटांकडे सर्वात कणखर चोच असते. ते सर्वात कठीण कवच असलेले पदार्थ देखील आपल्या चोचीने फोडू शकतात. पक्षांच्या सर्व जातींपैकी पोपटाला सर्वात बुद्धिमान पक्षी मानले जाते कारण ते उत्तम प्रकारे ऐकलेल्या आवाजाची नक्कल करू शकतात.

भारतीय पोपटांचे आयुष्य हे सरासरी २०-३० वर्ष्यापर्यंत असते. ते बहुदा कीटक, फळे, बियाणे खातात. हे पदार्थ खाण्यामध्ये त्यांची वक्राकार चोच त्यांना खूप उपयुक्त ठरते. त्याला मुख्यतः पेरू, कठीण कवचाची फळे आवडतात

पोपट हे सहसा झाडांच्या पोकळीत आपले घरटे बांधतात. ते हवेत वेगाने उड्डाण करू शकतात. पोपट हे एकत्र राहतात आणि बर्‍याचदा अन्नाच्या शोधात एकत्रितपणे बाहेर पडतात.

पोपटांच्या सर्वच जातींमध्ये नर व मादा सारखेच दिसतात. त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी आपणास त्यांच्या रक्ताची चाचणी करावी लागते. इतर पक्ष्यांच्या प्रजातींप्रमाणे पोपटही अंडी देतात. त्यांच्याकडे असलेल्या नक्कल करण्याच्या क्षमतेमुळे ते आपल्याला हवेहवेसे वाटतात. त्यांच्या याच वृत्तीमुळे आपण त्यांना पिंजऱ्यात ठेवतो परंतु हे सरासर चुकीचे आहे कारण प्रर्त्येक प्राण्याला स्वतःचे आयुष्य मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे.

जगातील सुमारे एक चतुर्थांश पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलतोडी व होणारा पर्यावरणाचा ह्रास यामुळे सुंदर अश्या या पोपटांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

पोपटाबद्दल काही थोडक्यात माहिती

  • वैज्ञानिक नाव: Psittaciformes (पित्तासिफोर्म्स)
  • थोडक्यात माहिती : पोपट हे बऱ्याच रंगामध्ये अढळतात परंतु भारतात ते प्रामुख्याने हिरव्या रंगामध्येच आढळतात.
  • आकार : पोपटांचे आकार हे त्यांच्या विविध जातींनुसार आढळतात. परंतु भारतात ते प्रामुख्याने ३०-४० सेंमी पर्यंत आढळतात.
  • वजन : सरासरी 260 ग्रॅम
  • पंखांची लांबी : सरासरी १५-१८ सेंमी

कृपया लक्ष द्या....

पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व हे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वाचे काम करत असते. आपण मानव सुद्धा याचाच एक भाग आहोत तसेच प्रत्येक प्राण्याची पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका व गरज आहे. पोपट हा त्यातील एक. ते जंगलात असो किंवा बंदिवासात, त्यांचे अस्तित्व टिकून राहणे हि आपली जबाबदारी आहे. या पक्ष्यांना पकडणे, मारणे हे काही बरोबर नाही. या पक्ष्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आपणच त्यांची चांगलीकाळ्जी घेतली पाहिजे. चला तर मग आपण अश्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींना वाचविण्यास मदत करू आणि त्यांची संख्या वाढविण्यास प्रयत्न करूयात.

तर आपणास हि माहिती आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. हि माहिती आपली मित्र मैत्रिणींशी नक्कीच शेअर करा.

पोपटा विषयी माहिती Parrot information in marathi

parrot information in marathi पोपट हा पक्षी जगातील सुंदर पक्षांपेकी एक आहे त्याचा हिरवा रंग आणि लाल चोच लोकांना आकर्षित करते आणि या रंगांच्या एकत्रीकरणामुळे पोपट (parrot in marathi) हा पक्षी सुंदर दिसतो. पोपटाच्या वेगवेगळ्या जाती आहेत आणि या वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे पक्षी असतात. पोपट (popat chi mahiti) हा असा पक्षी आहे ज्याला माणसांमध्ये राहायला खूप आवडते आणि तो माणसाची नक्कल हि चांगल्याप्रकारे करू शकतो त्याचबरोबर हे पक्षी दरवाज्याच्या बेल चा, फोनच्या रिंग चा, वैक्युम क्लीनरचा तसेच अनेक वेगवेगळे आवाज काढू शकतो आणि हा पक्षी त्याला शिकवले तर गाणे सुध्दा गाऊ शकतो . पोपटाला जर आपण पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवले तर त्याला पिंजर्याची सवय होते (popat information in marathi) आणि तो पिंजरा सोडून कुठेहि जात नाही आणि जर गेलाच तर परत फिरून येतो. या पक्षाची स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे पोपटाला  आपण जे सांगेल ते सर्व लक्षात राहते तसेच सर्वांची नावेही तो लक्षात ठेवू शकतो. त्याच्या मिठू मिठू बोलण्यामुळे तो सर्वांना हवा हवासा वाटतो आणि पोपटाला एक पाळीव पक्षी म्हणून पाळले हि जाते.  

पोपटाची माहिती (parrot information in marathi)

पोपट कुठे व कसे राहतात ( parrot habitat )

पोपट हा पक्षी उष्ण भागामध्ये किवा उष्ण कटिबंधात राहतात त्यांना जास्त थंड हवा सोसत नाही. हे पक्षी आपले घरटे उंच आणि दाट पाने असलेलेया झाडावर करतात किवा झाडामध्ये जर पोकळी असेल तर त्यामध्ये आपले घरटे बनवतो तसेच त्यांना माणसांजवळ हि राहायला खूप आवडते. पोपट हे पक्षी समूहाने राहतात आणि समूहानेच आकाशामध्ये उडतात.

चिमणी पक्षाबद्द्ल माहिती 

पोपटाचा आहार ( parrot diet ) (parrot in marathi)

पोपट या पक्ष्याचे पेरू आणि मिरची आवडता आहे त्याचबरोबर हे पक्षी फळे, धान्य, बियाणे, कीटक, कठीण फळे आणि शिजलेला भातही खातात.

पोपट या पक्ष्याचे प्रकार ( types of parrot in marathi)

पोपट हा एक सुंदर आणि रंगीबेरंगी पक्षी आहे जे पक्षी उष्ण कटीबंधात राहायला पसंत करतात. हे पक्षी वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे असतात आणि या पक्ष्यांचे रंग आणि आकार हे त्यांच्या जातिवा अवलंबून असतात. या पक्ष्याच्या ३५० जाती आहे आहेत आणि काही जातीमध्ये नर पोपट आणि मादी पोपट एकसारखे असतात.

कावळ्याची माहिती 

भारतीय पोपटांच्या जाती ( types of indian parrot in marathi )

भारतामध्ये सुध्दा वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे पोपट आढळतात या मधील काही प्रसिध्द जाती खाली दिल्या आहेत.

रेनबोव पोपट ( rainbow parrot information in marathi )

हा पोपट वेगवेगळ्या रंगाचा असतो आणि हा पक्षी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतो. या प्रकारचा पोपट जंगलामध्ये आढळतो आणि या पक्ष्याला काही लोक पाळतात सुध्दा. हे पक्षी मध्यम आकाराचे असतात या पक्ष्याची लांबी २७ ते ३० सेंटी मीटर असते आणि या पक्ष्यांची शेपूट १० इंच असते.

रेनबोव पोपट कुठे आढळतात : ह्या जातीचे पोपट मुळचे ऑस्त्रोलियाचे आहेत आणि हे पक्षी  घनदाट जंगले किवा पाण्याच्या किनाऱ्यावर असणारे झाडांचे झुडूपांवर आपली घराती बनवतात.

रेनबोव पोपटाचा आहार : हे पक्षी अमृत फळे व इतर फळे आणि बिया खातात.

आयुष्य : या पक्ष्याचे आयुष्य १६ ते २० वर्ष असते.

आफ्रिकन ग्रे पोपट ( african grey parrot information in marathi )

आफ्रिकन ग्रे पोपटाला काँगो आफ्रिकन ग्रे पोपट ह्या नावानीही ओळखला जातो. हा पक्षी मुलाचा आफ्रिकेमधी आहे आणि तो भारतामध्ये हि आढळतो. या पक्ष्याचा रंग राखाडी असतो आणि डोळ्याच्या भोवती पांढरा गोल असतो आणि या पक्ष्याची चोच काळ्या रंगाची असते. या पक्ष्याची लांबी ३३ सेंटी मीटर असते आणि वजन ४०० ग्रॅम असते.

आफ्रिकन ग्रे पोपट कुठे आढळतात : हे पोपट आफ्रिकेमध्ये काँगो, गाबोन, घाना , उन्गडा आणि अंगोला मध्ये आढळतात. ह्या जातीचे पोपट रेन फॉरेस्टमध्ये राहणे पसंत करतात.

आफ्रिकन ग्रे पोपटाचा आहार : हे पोपट बेरी, बिया, धान्य आणि फळे खातात.

आयुष्य : या जातीच्या पोपटांचे आयुष्य जंगलामध्ये २१ ते २३ वर्ष असते आणि जर त्यांना पिंजऱ्या मध्ये ठेवले तर त्यांचे आयुष्य ४५ ते ५० वर्ष असते.

कैक पोपट ( caique parrot information in marathi )

कैक पोपट हा दिसायला खूप छान असतो या जातीच्या पक्ष्यामध्ये वेगवेगळे शेड असतात जसे कि काळा, पिवळा ,हिरवा, नारंगी आणि पांढरा आणि या जातीच्या पोपटाला पहिले कि आपल्याला भारताच्या तिरंग्याची आठवण होईल कारण त्यामध्ये जास्त हिरवा, पांढरा आणि नारंगी रंग असतो आणि ते रंग या पोपटावर उटून दिसतात. या पोपटाला ब्लॅक हेडेड पोपट हि म्हणतात कारण त्याच्या डोक्यावर फक्त काळा रंग असतो.

कैक पोपट कुठे आढळतात : हे पोपट मुळचे ब्राझील या देशातील आहेत आणि हे भारतामध्येही आढळतात. या प्रकारचे पक्षी सवाना किवा उष्ण कटीबंधात राहणे पासात करतात.

कैक पोपटाचा आहार : हे पोपट वनस्पतीची पाने तसेच फुले आणि बिया खातात.

आयुष्य : हे पोपट ४० वर्षापर्यंत जगू शकतात.

रोज रीन्गड पोपट ( rose ringed parrot information in marathi )

रोज रीन्गड पोपट हे पोपट भारतामध्ये सगळी कडे आढळतात आपण जो फिकट हिरव्या रंगाचा आणि लाल चोच असलेला पोपट बघतो त्याला रोज रीन्गड पोपट म्हणतात . ह्या जातीचे पोपट आफ्रीकेमध्ये हि आढळतात. या पोपटाल रिंग नेक्ड पोपट या नावानेही ओळखले जाते कारण त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचे वर्तुळ असते.

रोज रीन्गड पोपट कुठे आढळतात : हे पक्षी मुळचे आशिया आणि आफ्रिकेमधील आहेत आणि हे पक्षी घनदाट जंगलामध्ये आढळतात.

रोज रीन्गड पोपटाचा आहार : हे पोपट बिया, धान्य, फळे आणि गवत खातात.

आयुष्य : रोज रीन्गड पोपट हे १५ ते २० वर्ष जगू शकतात.

ब्लू-यल्लो मकाव :(parrot information in marathi)

ब्लू-यल्लो मकाव या पोपटाला ब्लू-गोल्ड मकाव या नावानेही ओळखले जाते. हा पोपट दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. हा पक्षी निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या अश्या तीन रंगाचा असतो आणि तो आकाराने मोठा असतो. या पोपटाची लांबी ८५ सेंटी मीटर असते आणि वजन १.५ किलो असते.

ब्लू-यल्लो मकाव पोपट कुठे आढळतात : ब्लू-यल्लो मकाव पोपटाची मुल जात हि दक्षिण अमेरिकेतील आहे आणि ह्या पोपटाला घनदाट जंगलांमध्ये राहायला खूप आवडते.

ब्लू-यल्लो मकाव पोपटाचा आहार : हे पोपट फळे, धान्य आणि बिया खातात.

आयुष्य : या पोपटाचे आयुष्य ३१ ते ३५ वर्ष असते.

अमेझॉन पोपट (parrot information in marathi)

अमेझॉन पोपट हे आकाराने लहान असतात आणि त्यांची शेपूट हि लहान असते हे पोपट पुरपणे हिरव्या रंगाचे असतात आणि डोक्यावर थोडासा पोवाल्सार रंग असतो. हे पक्षी कळपामध्ये राहतात आणि ह्या जातीचे पोपट खूप कार्यक्षम असतात आणि ते दिसायलाही खूप सुंदर असतात. या पक्ष्याची लांबी १० ते १२ सेंटी मीटर असते.

अमेझॉन पोपट कुठे आढळतात : हे पोपट दक्षिण अमेरिका, मेक्सिको, कॅरीबेअन या देशामध्ये आढळतात तसेच या जातीच्या पोपटांना झुदुपांमध्ये राहायला आवडते.

अमेझॉन पोपटाचा आहार : हे पोपट फळे, बिया आणि वनस्पतीची कोवळी पाने खातात.

आयुष्य : या पोपटाचे आयुष्य ४० ते 50 वर्ष असते.

अलेक्झान्द्राइन पोपट ( alexandrain parrot information in marathi )

हे जातीचे पोपट भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ते भारतामध्ये सर्व ठिकाणी आढळतात. हे पक्षी हिरव्व्या रंगाचे असतात, चोच लाल असतात आणि पंख हिरवे असतात आणि पंखांवर लाल रंगाचे शेड असते. या पक्ष्याची शेपूट लांब असते.

अलेक्झान्द्राइन पोपट कुठे आढळतात : हे पोपट भारत, नेपाल आणि पाकीस्थान मध्ये आढळतात.

अलेक्झान्द्राइन पोपटाचा आहार : हे पोपट बिया, पीच फळे आणि फुले खातात.

आयुष्य : या पोपटाचे आयुष्य ३० ते ४० वर्ष असते.

गलाह ( galah parrot information in marathi )

गलाह या पोपटाचा आश्चर्यकारक आणि वेगळा रंग नेत्रदीपक आहे. ह्या पोपटाला कळपात राहायला आवडते. या पोपटाचा रंग पांढरा, गुलाबी आणि राखाडी असतो. या पक्ष्याची लांबी ३५ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याला रोज ब्रिसटेड पोपट या नावानेही ओळखले जाते.

गलाह पोपट कुठे आढळतात : हे पोपट मुळचे ऑस्ट्रोलिया मधील आहे. हे पोपट आपली घरटी घनदाट जंगलांमध्ये किवा सवाना मध्ये बनवतात.

गलाह पोपटाचा आहार : बेरीज, इतर फळे आणि बिया खातात.

आयुष्य :  ह्या पोपटांचे आयुष्य ३५ ते ४० वर्ष असते.

बडगेरीगर पोपट ( budgerigar parrot information in marathi )

हा पोपट खूप सुंदर आणि आकर्षित असतो आणि हे पोपट आकाराने खूप लहान असतात ( या पोपटाची लांबी १८ सेंटी मीटर असते) तसेच या पोपटाला शेल पोपट हि म्हंटले जाते. हे पोपट पाळण्यासाठी उत्तम आहेत.

बडगेरीगर पोपट कुठे आढळतात : या पोपटाची जात हि मुळची ऑस्ट्रोलियाची आहेत.

बडगेरीगर पोपटाचा आहार : हे पोपट धान्य, बिया, फळे खातात.

आयुष्य : ह्या पोपटाचे आयुष्य खूप कमी असते हे पोपट ४ ते ८ वर्ष जगू शकतात.

ससाणा पक्षाची माहिती 

पोपटाच्या काही प्रसिध्द जाती ( some famous types of parrot in marathi )

पोपटाच्या काही जाती जगभरामध्ये प्रसिध्द आहेत यामधील काही प्रकार खाली संक्षिप्त स्पष्टीकरना सोबत दिले आहेत.

स्कारलेट मकाव पोपट ( scarlet macaw parrot information in marathi )

स्कारलेट मकाव पोपट हे खूप हुशार आणि उत्साही पक्षी आहे. जर ह्या जातीचे पोपट पिंजऱ्या मध्ये बंद असतील तर त्यांना रोज फिरणे आणि व्यायाम गरजेचा असतो. हे पक्षी लगेच कंटाळतात यांना लहान मुलांसाठी जसे खेळणे लागतात तसे या पोपटांना हि फिरणारे खेळणे लागते. या पोपटाची लांबी ३० ते ३९ इंच असते आणि वजन १.९ किलो इतके असते.

सल्फर-क्रेस्टेड कॉककाटो ( sulphur-crested cockatoo parrot)

या प्रकारच्या पोपटाला आपला वेळ लोक्कांच्या सोबत घालवायला खूप आवडतो. या पक्ष्यांची लांबी १५ इंच असते आणि या पक्षाचे वजन ३५० ते ८७० ग्रॅम असते. या पक्ष्याचे पंख पिवळे , चोच काळ्या रंगाची असते. नर पोपट हा गडद तपकिरी रंगाचा असतो आणि मादी पोपट हे लालसर रंगाचे असतात. या पक्ष्यांचा आयुष्य काळ खूप दिवस असतो हे पक्षी ७५ ते ८० वर्ष जगू शकतात.

अम्ब्रेला कॉककाटो ( umbrela cockatoo parrot)

 अम्ब्रेला कॉककाटो हे पोपट पिंजर्यामध्ये ठेवले तर ते ७० ते ७५ वर्ष जगू शकतात. हे पोपट खूप सभ्य आणि गोड आहेत. या पक्ष्यांचे वजन ४५० ते ७५० इतके असू शते आणि लांबी १८ इंच असते. या पक्ष्यांचे पंख पांढरे असतात आणि त्यांच्या शेपटीवर फिकट गुलाबी पिवळसर रंग असतो आणि काळ्या रंगाची चोच असते.

कोनुर्स पोपट ( conures parrot)

कोनुर्स पोपट हे मध्यम आकाराचे असतात आणि या पक्ष्यांचे आयुष्यमान १२ ते ३० वर्ष असते. हे जातीचे पोपट मुळचे दक्षिण अमेरिका आणि मेक्सिको मधील आहेत. या पोपटांना प्रशिक्षण देणे खूप सोपे आहे कारण ते आपण जे काही बोलायला शिकवू ते लगेच शिकतात तसेच हे पोपट खूप मनोरंजक असतात.

मोन्क पोपट ( monk parrot)

कोनुर्स पोपटाला क्वाकर पोपट या नावानेही ओळखले जाते. ह्या जातीचे पोपट आर्जेन्टीना या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात . हे पक्षी माणसांची उत्तम नक्कल करू शकतात. या पक्ष्याचे आयुष्य १५ ते २० वर्ष असते आणि या पक्ष्याची लांबी २९ ते ३० इंच असते.

एक्लेक्टस पोपट ( eclectus parrot)

एक्लेक्टस पोपट हे पूर्व किवा दक्षिण ऑस्ट्रोलिया, मोलुक्कास, सुम्बा या देशामध्ये आढळतात. नर पोपट हे फिकट हिरव्या रंगाचे आणि मादा पोपट हे लाल, जांभळ्या किवा निळ्या रंगाचे असतात. या पोपटाची लांबी १४ इंच असते आणि नर आणि मादा पोपट हे दिसायला वेगवेगळे असतात. हे पोपट खुप हुशार आणि प्रेमळ असतात.

पोपट या पक्ष्याबद्दल काही तथ्ये ( facts of parrot in marathi)

  • पोपट हा एकमेव पक्षी आहे जो आपल्या पायाने खातो.
  • काही पोपटांचे प्रकार ७५ ते ८० वर्ष जाऊ शकतात.
  • पोपटाची चोच खूप मजबूत असते म्हणून ते कोणतीही कठीण फळे किवा बिया अगदी सहजपणे फोडू शकतात.
  • इंग्रजीमध्ये पोपटाला पॅरॉट किवा लोरीकीट असे म्हंटले जाते.
  • अमेरिका आणि ऑस्ट्रोलिया मध्ये पोपटांच्या अनेक वेगवेगळ्या जाती आढळतात.
  • पोपटाची एक अनोखी गोष्ट म्हणजे लोक जसे आपल्या मुलांची नावे ठेवतात तशीच नावे पोपट आपल्या पिल्लांची हि ठेवतो.
  • जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पोपट दक्षिण अमेरिकेमध्ये बघायला मिळतात.
  • भारतामध्ये १२ देशी पोपटाच्या जाती आहेत.
  • पोपट हा पक्षी सर्वात बुध्दिमान समजला जातो कारण हे वेगवेगळ्या आकृत्या तसेच गणितांची उत्तरेही सोडवू शकतो.

पोपटाचा उपयोग ( use of parrot in marathi)

  • पोपट हा बुध्दिमान आणि संवेदनशील पक्षी आहे त्यामुळे तो चांगला पाळीव पक्षी ठरू शकतो.
  • त्याच्या मोठ्या आवाजामुळे त्याचा उपयोग घराची राखण करणारा पक्षी म्हणून केला जातो.
  • पोपटाचा वापर भविष्य सांगण्यासाठी केला जातो.
  • काही पोपटांच्या जातीचा उपयोग गणिती क्षेत्रामध्ये हि केला जातो कारण ते कोणत्याही घानिताचे उत्तर सहजपणे शोधू शकतात.
  • पोपटांचा उपयोग सर्कस मध्येही केला जातो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा पोपट (parrot information in marathi pdf) हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. parrot information in Marathi language  हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच parrot in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पोपट या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about parrot in marathi/ parrot information in marathi for project माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Majha Nibandh

Educational Blog

essay information about parrot in marathi

पोपट संपूर्ण माहिती व निबंध Parrot Information in Marathi

parrot information in Marathi, My favorite bird parrot essay in Marathi, caged parrot essay in Marathi, maza avadta pakshi popat nibandh. Popat chi mahiti.

पोपट हा पक्षी दिसायला अधिक सुंदर आहे, त्याचे शरीर त्याची लाल चोच माणसाला त्याच्याकडे पटकन आकर्षित करते पोपट हा रंगबिरंगी असल्यामुळे तो प्रत्येकाला आवडतो. पोपटाचे शरीर अतिशय सुंदर आहे. ऑस्ट्रेलियासारख्या आणि दक्षिण अमेरिका सारख्या देशात त्याच्या अनेक जाती आढळतात.

पोपटाचा रंग हा हिरवा आहे व त्याची चोच लाल रंगाची आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वांना आवडतो. पोपट सुंदर असल्यामुळे तो पाळीव पक्षी म्हणून पाळला जाऊ लागला आहे, म्हणून तो काही पक्षी प्रेमिकांच्या घरामध्ये पिंजऱ्यामध्ये आढळतो. पोपट पक्षी झाडांच्या ढोलीत राहायला पसंत करतो.

Parrot Essay in Marathi

उंच झुपकेदार जास्त पाने असलेल्या झाडावर त्याला रहायला आवडते. पोपटाचे मिठू मिठू बोलणे सर्वांना फार आवडते. पोपट अनेक प्रकारची गोड फळे खातो. पोपटाच्या आवडीचे फळ प्रामुख्याने कवठाचे फळ, आंबा, आणि पेरु हि आहेत. पोपट इतर पक्षांप्रमाणे दाने, बिया डाळिंब इत्यादी सुद्धा खातो. पोपट पक्षी साधारणपणे चाळीस वर्षापर्यंत जगतात.

पोपट हा पक्षी समूहाने राहतो आणि आकाशामध्ये समूहाने विहार करतो. लहान मुलांना ज्याप्रमाणे बोलायला शिकवले जाते त्याप्रमाणे पोपटाला सुद्धा घरामध्ये पाहुणे आल्यावर किंवा एखादा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याला रामराम, नमस्ते असे शिष्टाचार सुद्धा शिकवले जातात. दारोदारी फिरणारे भविष्य सांगणारे लोक लोकांचे भविष्य सांगण्यासाठी पोपटाला पिंजऱ्या मध्ये अडकवुन फिरतात.

Parrot Essay in Marathi

लोकांचे भविष्य सांगण्यासाठी पोपटाचा उपयोग करतात. पोपट पक्षी जंगलाची शोभा वाढवणारा पक्षी आहे. पोपटाचा रंग हिरवा असल्यामुळे तो झाडांच्या झुपकेदार पानांमधून सहजासहजी दिसून येत नाही. जंगलामध्ये पोपटाला पकडण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. कारण तो घराची शोभा वाढवणारा पक्षी आहे. पोपट पक्षी घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे नमस्ते, राम राम म्हणून छान प्रकारे स्वागत करतो.

Parrot Information in Marathi/Popat chi mahiti.

20 व्या 21 व्या शतकामध्ये आपल्या भारत देशामध्ये पोपट पक्षी खूप दुर्मिळ होऊ लागला आहे. वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे अनेक जातीचे निरनिराळे पक्षी मरण पाऊ लागले आहेत. पक्षांना आकाशात विहार करण्यासाठी स्वच्छ सुंदर आकाश सुद्धा पूर्वीसारखे राहिलेले नाही. पोपटाचे मिठू मिठू बोलने सध्या पोपटाच्या जीवावर उठले आहे.

पोपट मिठू मिठू बोलतो म्हणून तो सर्वांना हवाहवासा वाटतो. मिठू मिठू बोलण्यामुळे तो लोकांना त्याच्याकडे पटकन आकर्षित करतो. लहान मुले शाळेमध्ये शिक्षकांनी आपल्या आवडत्या पक्षाचे चित्र काढायला सांगितल्यास, मुले पोपटाचे चित्र काढणे पसंत करतात व पोपटाला अतिशय छानपणे रंगवतात. पोपटाला पेरूची आणि आंब्याची फोड अतिशय आवडते. पोपट आपल्या वक्र टोकदार चोचीने तो सर्व फळ संपवतो.

पोपटाला नकला करायला खूप आवडतात. पोपट नकला अगदी हुबेहूब करतो. पोपट पक्षी बुद्धीने तल्लख आहे. पोपट हा सर्व पक्षांमध्ये अतिशय हुशार मानला जातो. पोपट हा आपल्या सर्वांचा चांगला मित्र आहे. आपण पोपटाला घरामध्ये पिंजऱ्यात बंदिस्त न ठेवता त्याला स्वतंत्रपणे आकाशात उडू दिले पाहिजे कारण ते त्याच आयुष्य आहे त्याला बंदिस्त करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.

सूचना : जर तुम्हाला parrot information in Marathi, My favorite bird parrot essay in Marathi/ Popat chi mahiti. हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Nibandhs

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | essay on parrot in marathi | my favorite bird parrot essay.

My Favorite Bird Parrot Essay

माझा आवडता पक्षी  पोपट मराठी निबंध | Essay On Parrot In Marathi,My Favorite Bird Parrot Essay, Parrot information in marathi

आज मी आपल्यासाठी  माझा आवडता पक्षी  पोपट मराठी निबंध | essay on parrot in marathi,my favorite bird parrot essay   निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.,   माझा  आवडता पक्षी   पोपट, हे   निबंध   सुधा   जरूर   वाचवे :-, टीप : वरील  माझा आवडता पक्षी  पोपट मराठी निबंध   याचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते..

  • पोपट पक्षाची माहिती मराठी
  • information on parrot in marathi
  • माझा आवडता प्राणी पोपट
  • essay of parrot in marathi
  • information of parrot in marathi
  • information about parrot in marathi
  • पोपटाची माहिती मराठी
  • parrot information in marathi

' class=

Related Post

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

पोपट पक्षी संपूर्ण मराठी माहिती | Parrot Marathi Information

पोपट पक्ष्याची माहिती information about parrot in marathi..

पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर व बहुसंख्य लोकांच्या पसंतीचा जर कोणता पक्षी असेल तर तो आहे पोपट. पोपटाला इंग्रजीत parrot म्हटले जाते. पोपट (Parrot) हे वेगवेगळ्या रंगीबिरंगी रंगांचे असतात. पोपट जवळपास संपूर्ण जगात आढळतात. जगभरात पोपटांच्या 350 पेक्षा जास्त जाती आहेत. आज आपण Parrot म्हणजेच पोपटा बद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत. ही Parrot information in Marathi आपण आपले ज्ञान वाढवण्यासाठी तसेच शाळा कॉलेजमधील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी वापरू शकतात.

Information About Parrot In Marathi. पोपट पक्ष्याची माहिती

पोपटा बद्दल माहिती (Popat Marathi Mahiti)

पोपटा हा मध्यम आकाराचा पक्षी असतो जो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळते. पोपट हे वेगवेगळ्या रंगांचे असू शकतात जसे पांढरा, निळा, हिरवा, रंगबिरंगी, पिवळा, लाल इत्यादी. जगभरात पोपटांच्या 350 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. पोपटाची लंबाई 10 ते 12 इंच असते. पोपट हा समजदार व बुद्धिमान पक्षी आहे. कोणतीही गोष्ट तो इतर पक्षांच्या तुलनेत लवकर शकतो. पोपट हा मनुष्याप्रमाणे बोलणे देखील शिकू शकतो. 

पोपटे उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्यांच्या आहार प्रत्येक प्रजाती नुसार वेगवेगळा असतो, पोपट हे शाकाहारी असतात ते वेगवेगळ्या भाज्या, फळे, बिया इत्यादी खातात. बरेच पोपट हे आपल्या पायाच्या सहाय्याने भोजन तोंडात पोचवतात. 

घरातील पिंजऱ्यामध्ये पोपट पाळले जातात. पाळीव पक्षाच्या रूपाने पोपट हा लोकप्रिय आहे. पोपट पकडून विक्री करणे मोठा व्यापार बनून गेला आहे.

पोपटा बद्दल उपयुक्त माहिती (Parrot Marathi Information)

1) पोपट मनुष्याच्या आवाजाचे अनुकरण करू शकतात..

पोपटांना मोठ्या प्रमाणात पाळण्यामागे एक कारण हे देखील आहे की पोपट मनुष्याच्या आवाजाचे हुबेहूब अनुकरण करू शकतात. माणसाशिवाय ते इतर पक्षी, प्राणी, घरातील वस्तू जसे फोन, व्याक्युम क्लिनर, वाहणारे पाणी, दरवाजे ची घंटी, मोबाईलची बेल इत्यादी आवाज काढू शकतात.

2) पोपट सर्वात समजदार पक्षांपैकी एक आहे

वैज्ञानिकांचे मत आहे की पोपटाकडे एका चार वर्षाच्या मुलाएवढी बुद्धी असते. पोपट खूप चंचल स्वभावाचा असतो. 

3) पोपट एक मात्र पक्षी आहे जो आपल्या पायाने खाऊ शकतो

पोपटाच्या प्रत्येक पायात चार पंजे असतात, दोन पुढे आणि दोन मागे. पोपटाचे पाय मजबूत असतात, ह्या पायांच्या मदतीने तो झाडाच्या फांद्यांना घट्ट पकडून ठेवतो. पोपटाचे पाय मनुष्याच्या हाताप्रमाणे कार्य करतात. तो आपल्या पायाने कोणतीही वस्तू उचलू शकतो, पोपट त्याचे अन्न पायांच्या मदतीने उचलून खातो.

4) काही पोपट 80 वर्षापेक्षा जास्त जगू शकतात

तसे पाहता पोपटांच्या प्रत्येक प्रजातीच्या जीवन काळ वेगवेगळा असतो. मध्यम आकाराचे पोपट 25 ते 30 वर्षे जगतात तर मोठ्या आकाराचे काही पोपट 60 ते 100 वर्षे जगतात. 

5) पोपटाची चोच खूप मजबूत असते

पोपटाच्या मुख्य विशेषता पैकी एक आहे त्याची चोच. त्याची चोच घुमावदर असते वरील चोच ही खालील चोचे पेक्षा मोठे असते. या शिवाय ही चोच मजबूत पण असते. पोपट या चोचेच्या मदतीने अक्रोड व नारळ सारखे टणक फळ पण तोडून टाकतात. 

essay information about parrot in marathi

पोपटा बद्दल रोचक माहिती (parrot Marathi information)

  • भारतात पोपटाला पाळणे बेकायदेशीर आहे.
  • पोपटाच्या पंखात अँन्टी बॅक्टेरियल तत्व असतात.
  • पोपट एक मात्र असा पक्षी आहे जो आपल्या पंखांच्या मदतीने अन्नाला पकडू शकतो.
  • पोपटाला वाचणे, मोजणे व बोलणे शिकवले जाऊ शकते.
  • पक नावाच्या एका पोपटाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान दिले आहे. कारण त्याने 1728 शब्द स्मरण केले होते.
  • जगातील सर्वात लहान व कमी वजनाचे पोपट पिग्मी प्रजातीचे आहे. त्याचे वजन दहा ग्रॅम असते.
  • पोपटाला कधीही चॉकलेट खाऊ घालायला नको. चॉकलेट खाल्ल्याने त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
  • अधिकांश पोपट एका पायावर उभे राहून झोपतात.
  • माणसांप्रमाणे पोपट पण लठ्ठपणाचे शिकार होतात.
  • पोपटांच्या उडण्याचा वेग 15 ते 25 किलोमीटर प्रति तास असतो. 
  • काकापो ही एकमात्र पोपटाची प्रजात उडण्यात सक्षम नसते, या मागील कारण त्यांचा लठ्ठपणा आहे.
  • उडण्यात सक्षम नसल्याने काकापो ही प्रजात विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. 

पोपट हा जगभरातील लोकांच्या पसंतीचा पक्षी आहे. या मुळेच आज पोपटाचा अवैध पद्धतीने व्यापार केला जात आहे. भारतात पोपट पकडणे तसेच कैद करून ठेवणे कायद्याने अपराध आहे. पण तरीही मोठ्या प्रमाणात लोक पोपटांना कैद करून ठेवतात असे करणे योग्य नाही. झाडावरील पक्ष्याची घरटी नष्ट करणे पण थांबवायला हवे पक्ष्यांना अधिकाधिक संरक्षण मिळवून द्यायला हवे. एक चांगला पक्षीमित्र बनण्यासाठी उपयुक्त माहिती आपण पुढे वाचू शकता.    How to protect birds in Hindi..

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My Favourite Parrot Bird Essay in Marathi

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My Favourite Parrot Bird Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे.या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” माझा आवडता पक्षी पोपट ( My Favourite Parrot Bird Essay in Marathi )” घेऊन आलेत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

पक्षी म्हटले की कोणाला आवडत नाही, या संपूर्ण सृष्टी वर प्रत्येकाला कुठलाना कुठला पक्षी हा आवडतच असतो. कारण पक्षी हे असतातच एवढे सुंदर की, त्यांचे ते रुप पाहून प्रत्येक जण मोहित होतो तसा त्यांचा आवाज देखील मनाला मोहित करणार असतो. पक्ष्यांचे रुप, रंग आणि त्यांचा आवाज हा खूप आकर्षित असतो.

सर्वसाधारण प्रमाणेच ” माझा आवडता पक्षी पोपट “ आहे.

कारण मला पोपटाचा रंग फार आवडतो आणि त्याचा आवाज सुद्धा म्हणून पोपट हा माझा आवडता पक्षी आहे.

पोपटाला इंग्रजी भाषेत पॅरेट ( Parrot ), हिंदीमध्ये तोता आणि मराठी मध्ये पोपट असे म्हणतात.

पोपट भारतात सर्वत्र बघायला मिळतो, पोपट या पक्षाला भारतात राघू , मिटू, मैना च्या नावाने ओळखले जाते. भारता प्रमाणेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये पोपट पहायला मिळतो.

जगभरत पोपट निळा, पांढरा, गुलाबी, पिवळा, लाला अशा वेगवेगळ्या रंगाचा आढळतो. परंतु भारतात आढळणारा पोपट हा मुख्यतः हिरव्या रंगाचा असतो.

पोपटाच्या वजन सुमारे 110 ग्रॅम भरते, तसेच पोपटाची संपूर्ण उंची म्हणजे शेवटी पासून ते डोक्या पर्यंतची  ही 16 ते 35 सेमी असते. व पोपटाचा जीवन काळ हा 8 ते 40 वर्षाचा असतो.

म्हणून भारतात आढळणारा हा हिरव्या रंगाचा पोपट मला खूप आवडतो. संपूर्ण शरीराने हिरवा आणि चोच फक्त गडद लाल रंगाची असणारा हा पोपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आकर्षक करतो. पोपटाच्या या हिरव्या रंगाबद्दल एक अख्यायिका आहे ती म्हणजे अशी-

देवाने पोपटाला हिरवा रंग का दिला या मागचे कारण म्हणजे, पूर्वी कुठल्याही पक्षांना रंग नव्हता सगळे पक्षी रंगहिन होते. त्यामुळे शिकारी जंगलात येत व पक्षांची शिकार करून घेऊन जात होते.

त्यामुळे सर्व पक्षांनी श्रीगणेश देवाकडे विनंती केली, तेव्हा गणपती बाप्पा ने ठरवले की सर्व पक्षांना आता रंग द्यायचे.  त्यामुळे गणपती बाप्पा नी  सर्वप्रथम पोपटाला विचारले तुला कुठला रंग हवाय?

पोपट हा सर्व पक्षांमध्ये हुशार असल्याने पोपटाने हिरवा रंग मागितला त्यासोबतच पोपट म्हणाला की, ” माझे पूर्ण शरीर हिरव्या रंगाचे आणि चोच फक्त लाल रंगाची असावी.”

त्यामुळे मी हिरव्या झाडावर राहून सुद्धा मी शिकाऱ्यांच्या दृष्टीस पडणार नाही व माझे शरीर पण रंग सर्वांना आवडेल. अशा प्रकारे पोपटाने स्वतःच्या चतुराईने हिरवा रंग आणि लाल चोच घेतली,व सर्व पक्षांमध्ये एक आकर्षित पक्षी बनला.

पोपटाचे सुंदर रूप पाहून अलीकडे पोपटाला पाळीव प्राण्यां प्रमाणे पाळले जात आहे. म्हणून बहुतेक पक्षी प्रेमींच्या घरात पोपट हा पक्षी पिंजरा मध्ये आढळतो.

परंतु पोपटाच्या मुख्य घरट्याला ‘ ढोली ‘ असे म्हणतात. पोपटाची ढोली ही झाडांच्या पोकळीत असते. उंच झुपकेदार पाने असणाऱ्या झाडांवर पोपटाला राहायला आवडतं.

पोपटाचा आवाज मिठू मिठू असा असतो ,त्यामुळे सर्व लहान मुले पोपटाकडे आकर्षित होतात. पोपटाचे हे मिठू मिठू बोलले सर्वांना फार आवडते.

पोपटाच्या या मिठू मिठू आवाजामुळे पोपटाला सर्कशीत अथवा घरामध्ये ठेवतात. पोपट आपल्या मनुष्याचे बोलण्याचे हुबेहूब परिवर्तन त्याच्या आवाजात करू शकतो. त्यामुळे भविष्य बघण्या मध्ये पोपटाचा वापर करून पैसे कमावतात. पोपटाची ही बोलण्याची कला इतर कुटल्याही पक्ष्या मध्ये पाहायला मिळत नाही.

पोपटाचे खाद्य म्हणजे फळे असतात, फळे खाणे पोपटाला खूप आवडते. विशेषता आंबा, डाळिंब, पेरू ही फळे पोपट आवडीने खातो. त्यासोबतच मिरची पोपटाला फार आवडते. तसेच इतर पक्ष्यांप्रमाणे पोपट दाणे, बिया, शिजलेले अन्न इत्यादी पदार्थ खाद्य म्हणून खातात.

पोपट हा पक्षी समूहाने राहतो आणि समूहाने आकाशात विहार करतो. पोपटाच्या या समूहाने राहण्याच्या गुणा मुळे पोपटावर एक कथा सुध्दा आहे ती म्हणजे ” शिकारी आणि पोपटाचा थावा “, तसेच पोपट या पक्षाबद्दल अनेक बालकथा सुद्धा आहेत. या कथा तून लहान मुलांना लहान वयातच पोपट या पक्षाबद्दल आपुलकी निर्माण होते.

जगभरात सुमारे पोपटाच्या ३०० पेक्षा ( तीनशे पेक्षा ) अधिक प्रजाती आढळतात. पण अलीकडे वाढती लोकसंख्या त्यामुळे होणारे प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे या पक्षांच्या प्रजातींची संख्या कमी होत आहे. पक्षी हे निसर्गाने दिलेले सुंदर देणगी आहे, मग कुठलाही पक्षी असू द्या.

त्यासोबतच शिकारी अशा पक्षांची शिकार करतात यामुळे सुद्धा पोपटांचे संख्या कमी होत आहे, काही लोक पोपटाला ना बंदिस्त पिंजरा मध्ये ठेवतात. त्यांना गुलाम बनवतात, त्यांची स्वातंत्रता हिसकावून घेतात.

परंतु पोपट झाडावर राहतो.त्यामुळे आपण या पोपटाला बंदिस्त न ठेवता त्यांना स्वतंत्रपणे संचार करण्या साठी सोडले पाहिजे. त्या सोबतच पोपटचे मुख्य निवास स्थान असलेली झाडे वाचविण्यासाठी  वृक्षतोड थांबवली पाहिजे सोबतच प्रदूषणही कमी केले पाहिजे.

त्यांना आकाशात निर्भयतेने उंच भरारी घेऊ दिली पाहिजे. पोपटाला घरामध्ये पिंजऱ्यामध्ये बंदिस्त न ठेवता आकाशात सोडले पाहिजे. पक्षी हे निसर्गाची शोभा त्यामुळे त्यांना निसर्गातच राहू दिले पाहिजे. त्यांना निसर्गात ठेवून निसर्गाची शोभा  वाढवली पाहिजे व पक्षाच्या सौंदर्याचे कौतुक केले पाहिजे.

अशा प्रकारे माझा आवडता पक्षी पोपट आहे त्यामुळे त्याच्या रक्षणाची जबाबदारी ही सुद्धा माझी वैयक्तिक आहेच. माझ्या सोबतच अनेक पक्षी प्रेमी किव्वा पोपट प्रेमी यांनी या पक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे एक दिवस नक्कीच या पक्ष्यांची संख्या वाढेल.

तर मित्रांनो ! ” माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध ( My Favourite Parrot Bird Essay in Marathi) “   वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

” माझा आवडता पक्षी पोपट ” ( My Favourite parrot Bird Essay in Marathi) “ यामध्ये आमच्या कडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • तानसा अभयारण्य माहिती 
  • सागरेश्वर अभयारण्य माहिती
  • मी चित्रकार झालो तर मराठी निबंध 
  • पन्हाळा गड किल्ल्याची माहिती 
  • महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती

 धन्यवाद मित्रांनो  !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध Essay on My Favorite Bird Parrot in Marathi

माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध Essay on My Favorite Bird Parrot in Marathi: जगात विविध प्रकारचे पक्षी आहेत. प्रत्येक पक्ष्याची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. मोराला रंगीबेरंगी पंख असतात, कोकिळाला गोड, मधुर बोली असते, कावळ्याला हुशारी असते, घार आणि गरुड सामर्थ्यवान आहे. सुंदर, पांढरा हंस शहाणपणा आणि न्यायाचे प्रतीक आहे. अशाप्रकारे, प्रत्येक पक्षीकडे काहींना-काही विशेतता असते, परंतु मला सर्व पक्ष्यांमधील पोपट आवडतो.

स्वरुप आणि स्वभाव

पोपट हा एक दुर्मिळ पक्षी आहे. त्याचा हिरवा रंग, लाल रंगाची चोच, घश्याची काळी पट्टी आणि मऊ पिसे मनाला भुरळ घालतात. त्याला वाढवणे खूप सोपे आहे. तो शाकाहारी आहे. तो फळ, मिरची, पीठ इत्यादींनी आनंदी होतो तो घरी सर्वांशी मिसळत घरातला वाटतो. पिंजऱ्यात बसलेला बोलणारा एक पोपट माणसाला खरंच घराचे सौंदर्य आहे.

निसर्गाने पोपटांमध्ये शहाणपणा भरभरून भरला आहे. त्याला काहीही शिकवले तेव्हा तो पटकन शिकतो. आजीबरोबर तो राम-राम बोलतो, मुलांसमवेत इंग्रजी बोलतो, पाय उंचावून तो आजोबांना अभिवादन करतो. तो कोणतीही भाषा शिकू आणि बोलू शकतो. त्याची बोलीसुद्धा खूप गोड आहे.

पाहुणे घरी आल्यावर त्यांचे स्वागत करण्यास पोपट कधीही विसरत नाही. तो ‘ये’ असे म्हणत परिचित पाहुण्यांचे स्वागत करतो. त्याच्या तोंडून ‘नमस्ते’, ‘स्वागत’ किंवा ‘वेल-कम’ ऐकून पाहुणेसुद्धा खाली उतरून येतात. तेसुद्धा त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांनी त्याचे खूप कौतुक केले.

प्राचीन काळापासून पोपट हा लोकांचा आवडता पक्षी आहे. ऋषि-मुनी त्याला आपल्या आश्रमात वाढवत असत. राजवाड्यांमध्ये छंदाने त्यांचे पालनपोषण केले जात होते. असे म्हटले जाते की पं. मंडन मिश्रा यांच्या घरी पोपट आणि मैना आपापसात संस्कृतमध्ये वाद घालत असत!

एकदा मी जत्रेत गेलो होतो. तिथून मी एक पोपट विकत घेतला. आज तो माझा प्रिय मित्र झाला आहे. मी त्याला ‘आत्माराम’ म्हणतो. देवाची सुंदर मूर्ती पाहिल्यावर ज्याप्रमाणे एखाद्या भक्ताला आनंद होतो, त्याचप्रमाणे आत्मारामच्या पिंजऱ्याजवळ बसून मला आनंद होतो. आत्मारामला पाहून माझ्या मनाला मोठा आनंद होतो.

असा एक आश्चर्यकारक आणि मोहक पक्षी माझा आवडता पक्षी का नको?

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

पोपट निबंध 10 ओळी | 10 Lines on Parrot in Marathi

पोपट निबंध 10 ओळी.

  • पोपट हिरव्या-पोपटी रंगाचा असतो.
  • त्याची चोच लाल बाकदार असते.
  • पोपटाला हिरवी मिरची, कैरी, बोरे आणि पेरू खूप आवडतात.
  • तो जंगलात झाडांवर राहतो.
  • त्याचे पंख सुंदर असून नख्या तीक्ष्ण असतात.
  • काही पोपट माणसांसारखे काही शब्द बोलू शकतात.
  • मुलं प्रेमाने त्याला मिठू मिठू पोपट असे म्हणतात.
  • आपण पोपटाला पिंजऱ्यात ठेवता कामा नये.
  • तो नेहमी झाडाच्या पोकळीमध्ये घर करून राहतो
  • पोपट हा खूप हुशार पक्षी आहे.

10 Lines on Parrot in Marathi

पोपट  निबंध 10 ओळी, 10 Lines on Parrot in Marathi, Essay on Parrot in Marathi

पोपट विषयी काय विशेष आहे?

ते रंगीबेरंगी, बर्‍यापैकी हुशार, अत्यंत मिलनसार आणि दीर्घकाळ जगणारे प्राणी आहेत. रंग, वजन आणि सवयी यासारख्या वैशिष्ट्यांमध्ये पोपटाच्या वेगवेगळ्या प्रजाती मोठ्या प्रमाणात बदलतात. जगभरात जवळजवळ 400 पोपटाच्या प्रजाती आहेत.

पोपट कसा बोलू शकेल?

पोपट आवाज काढण्यासाठी सिरिन्क्सवरून वाहणारी हवा सुधारित करून चर्चा करतात. सिरिन्क्स स्थित आहे जेथे श्वासनलिका फुफ्फुसांमध्ये विभागली जाते.

अजून वाचा :

  • पोपट पक्षी माहिती मराठी
  • कोंबडा निबंध 10 ओळी
  • कोंबडा निबंध 10 ओळी 
  • कबुतर निबंध 10 ओळी
  • चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
  • मोर निबंध 10 ओळी
  • फुलपाखरू निबंध 10 ओळी
  • मासे निबंध 10 ओळी
  • म्हैस निबंध 10 ओळी
  • बकरी/शेळी निबंध 10 ओळी
  • घोडा निबंध 10 ओळी 
  • उंट निबंध 10 ओळी 
  • मांजर निबंध 10 ओळी 
  • हत्ती निबंध 10 ओळी
  • वाघ निबंध 10 ओळी 
  • गाय निबंध 10 ओळी
  • कुत्रा निबंध 10 ओळी

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

COMMENTS

  1. माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध Essay On Parrot in Marathi

    त्यामुळं हा पक्षी कमीतकमी पाळाला जातो. असा हा पोपट पक्षी मला खूप आवडतो. आम्ही दिलेल्या essay on parrot in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास ...

  2. Information & Essay On Parrot In Marathi.

    पोपटाबद्दल माहिती आणि निबंध | Information & Essay On Parrot In Marathi. या पोस्टमध्ये आहे पोपटाबद्दल माहिती ( Information On Parrot In Marathi) तसेच निबंध. पोपट हा एक अतिशय सुंदर, अविश्वसनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी आहे. जगभरात सुमारे ३७२ प्रजातींचे पोपट आढळतात. पोपट हे चमकदार रंगाचे आढळतात. भारतातील पोपट हे हिरव्या रंगाचे असतात.

  3. पोपटा विषयी माहिती Parrot information in marathi

    रेनबोव पोपट ( rainbow parrot information in marathi ) हा पोपट वेगवेगळ्या रंगाचा असतो आणि हा पक्षी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतो. या प्रकारचा पोपट ...

  4. Information On Parrot In Marathi | पोपटाबद्दल माहिती आणि ...

    पोपटाबद्दल माहिती आणि निबंध | Information & Essay On Parrot In Marathi. पोपट हा एक अतिशय सुंदर, अविश्वसनीय आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी आहे. जगभरात सुमारे ३७२ प्रजातींचे पोपट आढळतात....

  5. पोपट संपूर्ण माहिती व निबंध Parrot Information in Marathi

    Parrot Information in Marathi/Popat chi mahiti. 20 व्या 21 व्या शतकामध्ये आपल्या भारत देशामध्ये पोपट पक्षी खूप दुर्मिळ होऊ लागला आहे.

  6. माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | Essay On Parrot In ...

    पोपट निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात खालील प्रमाणे :-. पोपट पक्षाची माहिती मराठी. information on parrot in marathi. माझा आवडता प्राणी पोपट. essay of parrot in marathi ...

  7. पोपट पक्षी संपूर्ण मराठी माहिती | Parrot Marathi Information

    पोपट पक्ष्याची माहिती Information About Parrot In Marathi. पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर व बहुसंख्य लोकांच्या पसंतीचा जर कोणता पक्षी असेल तर तो आहे पोपट.

  8. माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | My Favourite Parrot Bird ...

    सर्वसाधारण प्रमाणेच ” माझा आवडता पक्षी पोपट “ आहे. कारण मला पोपटाचा रंग फार आवडतो आणि त्याचा आवाज सुद्धा म्हणून पोपट हा माझा आवडता पक्षी आहे. पोपटाला इंग्रजी भाषेत पॅरेट ( Parrot ), हिंदीमध्ये तोता आणि मराठी मध्ये पोपट असे म्हणतात. पोपट भारतात सर्वत्र बघायला मिळतो, पोपट या पक्षाला भारतात राघू , मिटू, मैना च्या नावाने ओळखले जाते.

  9. माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध Essay on My Favorite Bird ...

    माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध Essay on My Favorite Bird Parrot in Marathi: जगात विविध प्रकारचे पक्षी आहेत. प्रत्येक पक्ष्याची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. मोराला रंगीबेरंगी पंख असतात, कोकिळाला गोड, मधुर बोली असते, कावळ्याला हुशारी असते, घार आणि गरुड सामर्थ्यवान आहे. सुंदर, पांढरा हंस शहाणपणा आणि न्यायाचे प्रतीक आहे.

  10. पोपट निबंध 10 ओळी | 10 Lines on Parrot in Marathi

    पोपट निबंध 10 ओळी, 10 Lines on Parrot in Marathi, पोपट हिरव्या-पोपटी रंगाचा असतो. त्याची चोच लाल बाकदार असते.